राहुरी पोलिस ठाण्यात सात जणांवर पोस्को तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला*
*विवाहानंतर तीला दोन मुले झाली. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सात जणांवर पोस्को तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला*

राहुरी तालुक्यातील एक मुलगी सुमारे १५ वर्षाची असताना तीचा विवाह लावून देण्यात आला. विवाहानंतर तीला दोन मुले झाली. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सात जणांवर पोस्को तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेतील पिडीत मुलीचे आज रोजी वय १७ वर्षे ७ महिने असून ती संगमनेर तालुक्यातील आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तीचा विवाह राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील तरुणाशी लावून देण्यात आला होता. त्यानंतर पिडीत मुलीला एक मुलगा झाला. त्यानंतर २०२४ मध्ये तीला पून्हा एक मुलगी झाली. या घटने बाबत पिडीत मुलीने दिलेल्या जबाबावरून आरोपी संजय, आरोपी नंदा, तसेच पप्पु ऊर्फ पोपट लक्ष्मण सुरसे, लक्ष्मण सुरसे, लता लक्ष्मण सुरसे, सर्व रा. सोनगाव, ता. राहुरी, तसेच नारायण पुंजा मोरे, भागु नारायण मोरे, रा. नान्नज घुमाला ता. संगमनेर, अशा सात जणांवर गुन्हा रजि. नं. २५७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ६५ (१), सह बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण कायदा कलम ४, ८, १० व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहे.
बाल विवाह लावून देणे हा कायद्याने गुन्हा आहे. हे माहित असताना देखील अल्पवयीन मुलांचे लग्न लावून दिले जातात. परिणामी अल्पवयीन मुलीला मोठ्या प्रमाणावर यातना सहन कराव्या लागतात. प्रसूतीच्या वेळी मुलीच्या जिवावर देखील बेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बाल विवाह लावून देणाऱ्या लोकांवर या गुन्ह्यामुळे चांगलीच चपराक बसणार आहे








