शेवगाव तहसीलदार यांची कारवाई. अवैध वाहतूक करणारे दोन डंपर पकडले .

शेवगाव तहसीलदार यांची कारवाई. अवैध वाहतूक करणारे दोन डंपर पकडले .

हदगाव-गोदावरी पात्रातून मराठवाडा हद्दीतून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर शेवगाव चे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी पकडले. ही कारवाई बोधेगाव शिंगोरी मार्गावर शिंगोरी शिवारात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली असून याबाबत पंचनामा करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सांगडे यांनी दिली.

याबाबत ते म्हणाले की मराठवाडा हद्दीच्या गोदावरी पात्रातून अवैधरित्या उपसा करून आणलेल्या वाळूची वाहतूक हादगाव परिसरातून बोधेगाव व शेवगाव कडे होत असल्याची माहिती मिळाली. पथक वाळू डंपर पकडण्यासाठी गेले असता शिंगोरी शिवारात दोन डंपर वाळू घेऊन जात असताना आढळून आले यावेळी (एम एच 32 क्यु८५८४) चा वाहन चालक कृष्णा शामराव वाघमारे व (एम एच १६ ए वाय२४७७) चा चालक भाऊसाहेब काकडे. या दोघांनाही वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर्स पकडण्यात आले दोन्ही वाहनात प्रत्येकी तीन ब्रास वाळू मिळून आली.

कारवाई तहसीलदार प्रशांत सांगडे. अप्पर तहसीलदार राहुल गुरव. नायब तहसीलदार रवींद्र सानप. कार्यालयातील अव्वल कारकून गोरे.का. तलाठी सचिन लोहकरे. मंगेश कदम. सोमनाथ आमने. यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह केली आहे.