विविध मागण्यासाठी नेवासा तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संपावर .

विविध मागण्यासाठी नेवासा तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संपावर .

विविध मागण्यासाठी नेवासा तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संपावर .

घोडेगाव (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेच्या आदेशानुसार नेवासा तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी गुरुवार दि १४डिसेंबर पासुन संपाचे हत्यार उपसले आहे. तसे निवेदनही नेवासा तालुका नायब तहसीलदार सानप यांना माध्यमिक शिक्षक संघटनेचे वतीने गुरुवारी देण्यात आले.

   मार्च महिन्यात ही माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने संप करण्यात आला होता.सरकारकडे वारंवार मागणी , पाठपुरावा करूनही सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने पुन्हा संपावर जाण्याची वेळ माध्यमिक शिक्षकांवर आली आहे .असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे अहमदनगर जिल्हा कोषाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सांगितले.

  नविन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. शासकीय निमशासकीय विद्यालयाचे कंपनईकरण धोरण थांबवा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत रुजू करा.अंशत: अनुदानीत विद्यार्थ्यांना अनुदानाचा पुढचा टप्पा मंजूर करा. रिक्त पदे त्वरित भरा. कंत्राटी कामगार धोरण समुळ नष्ट करा. पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दुर करा. अशा स्वरूपाच्या मागण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे.

   नेवासा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे अहमदनगर जिल्हा कोषाध्यक्ष अशोक सोनवणे,शिक्षक सेनेचे सचिव उध्दव सोनवणे, नेवासा तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संदिप शेंडगे, उपाध्यक्ष अनिल भणगे,सचिव मोहन औटी सह अनेक माध्यमिक शिक्षक यांच्या सह्या आहेत.