शिर्डी गोळीबार प्रकरणी संपत शंकर वायकर गावठी कट्टयासह जेरबंद,
शिर्डी गोळीबार प्रकरणी संपत शंकर वायकर गावठी कट्टयासह जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी (संभाजी शिंदे )
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
नमुद आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि सोपान गोरे तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे, रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप चव्हाण, अमृत आढाव व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमून शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 190/24 भादविक 307, 34 सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे दाखल खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपी नामे संपत शंकर वायकर रा. शिर्डी याचा शोध घेवुन मिळुन आल्यास ताब्यात घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथक दिनांक 22/03/24 रोजी शिर्डी परिसरात फिरुन आरोपीचे माहिती घेत असताना पोउनि/गोरे यांना आरोपी नामे संपत वायकर रा. शिर्डी हा त्याचे साथीदारासह विना नंबर पांढरे रंगाचे मोपेड मोटार सायकलवर अतिथी हॉटेल, सावळीविहीर फाटा, शिर्डी, ता. राहाता येथे येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने अतिथी हॉटेल, सावळीविहीर फाटा येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना सिन्नर रोडने एका विना नंबर पांढरे रंगाचे मोपेड मोटार सायकलवर 2 इसम येताना दिसले व ते अतिथी हॉटेल पासुन काही अंतरावर रोडचे बाजुला थांबले. मोपेडवर पाठीमागे बसलेला इसम खाली उतरला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथक त्यांना पकडण्याच्या तयारीत असताना संशयीतांना पोलीस पथकाची चाहुल लागताच मोपेडवर बसलेला इसम मोपेड चालु करुन निघाला व खाली उतरलेला इसम पळुन जावु लागला. त्यावेळी पथकाने पळणा-या संशयीतास शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) संपत शंकर वायकर वय 20 रा. पिंपळवाडी, शिर्डी, ता. राहाता असे असल्याचे सांगितले.
त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे अंगझडतीत 1 गावठी कट्टा मिळुन आला तो पथकाने ताब्याता घेतला.
ताब्यातील आरोपी नामे संपत शंकर वायकर याचेकडे वर नमुद गुन्ह्यातील साथीदार व गावठी कट्टा या बाबत विचारपुस करता त्याने मोपेडवर पळुन गेलेला साथीदार नामे 2) जॅक्सन शेख रा. पिंपळवाडी, शिर्डी, ता. राहाता (फरार) यास सोबत घेवुन व कब्जात मिळुन आलेल्या गावठी कट्टयाचा वापर करुन गुन्हा केल्याचे सांगितल्याने आरोपीस 30,000/- रुपये किंमतीचा गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) व 20,000/- रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकुण 50,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन शिर्डी पो.स्टे. गु.र.नं. 190/2024 भादविक 307, 34 सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासात शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
आरोपी संपत शंकर वायकर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा तयारी, जबरी चोरी व दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण - 09 गुन्हे दाखल आहेत .
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर वैभव कलुबर्मे , अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, शिरीष वमने , उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.