मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित.

मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित.

छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी 28 फेब्रुवारी पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर  बैठक घेण्यात आली, यामध्ये हे निर्णय घेण्यात आले,

        मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय.

 मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षण उपसमितीची काल बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

  यामध्ये सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात येणार. व्यवस्थापकीय संचालकांचे रिक्त पदे भरणार. सारथी पदाची रिक्त पदे महिन्याभरात भरणार. मराठा समाजासाठी आरक्षित असलेली इतर वस्तीगृह सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा समाजासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी, सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय देखील, घेण्यात आला आहे. 'सारथी' संस्थेसाठी आवश्यक असलेल्या, २७३ पदांसाठी भरती प्रक्रिया महिन्याभरात केली जाईल, मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या १८ नागरिकांच्या वारसांना राज्य परिवहन मंडळात रुजू करून घेण्यात आलं असून, उर्वरित प्रकरणांवरही तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश, या बैठकीत देण्यात आले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासह विविध महामंडळांची संचालक तसंच व्यवस्थापकीय संचालकांची रिक्त पदं, आवश्यकतेनुसार तातडीने भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.राज्य शासन आणि मंत्रिमंडळ उपसमितीने मराठा समाजाबाबत आजवर घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा या बैठकीत विस्तृत आढावा घेण्यात आला. तसंच प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कालबद्ध रितीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.