*अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्ष सश्रम कारावास*

अपरधी

*अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्ष सश्रम कारावास*

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्ष सश्रम कारावास* ‌‌                                                                                                                                                                            बी.पी.एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज.                               आंधळगाव:- पोलीस स्टेशन अंतर्गत प्रकरण असून फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलीची आईने दि १४/९/२०२० रोजी पोलीस स्टेशन आंधळगाव जिल्हा भंडारा येथील येऊन रिपोर्ट दाखल केली असता फिर्यादीने दिलेल्या रिपोर्ट वरून पो. स्टेशन आंधळगाव जिल्हा भंडारा येथे कलम ३७६ ,३७६(२)(N)३७६(AB)भा.द.वि सहकलमं ४.६

पोस्को अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले. गुन्हा नोंद होताच सदर गुन्ह्याची तपासणी करीता संबंधितअधिकारी यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले व संबंधित न्यायालयात पेश केले. सदर गुन्हातील संपूर्ण जप्त मुद्देमाल वेळीस रासायनिक परीक्षणासाठी पाठविले तसेच गुन्ह्याच्या सखोल तपास करून आरोपी विरुद्ध भौतिक रासायनिक व तांत्रिक साक्ष-पुरावा गोळा करून दोषारोपपत्र विशेष पोस्को न्यायालय भंडारा न्याय प्रतिष्ठान

येथे सादर करण्यात आले . सदर गुन्हातील सध्याचे ठाणेदार सुरेश मटृटामी यांनी साक्षदार यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करुन वेळीस साक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच कोर्ट पैरवी अमलदार गुरुदास गेडेकर ब.न.१०० उत्तरमरीत्या पैरवी केली आहे सरकारी वकील म्हणून श्री दुर्गा तलमले यानी सर्व पुरावे साखळीबद्द पद्धतीने मा. न्यायालयासमोर मांडले मा .अंजु शेंडे विशेष न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालय भंडारा यांनी दि १३/७/२०२२ रोजी सदर गुन्हातील आरोपी *गुलाब जयराम कडनायके* वय ४५ वर्ष रा गोंडी टोला आबागड ता. तुमसर यास २० वर्ष सश्रम कारावास व १०,०००/-रु दंडाची शिक्षा दिली आहे .

आरोपीस शीक्षा होण्यासाठी ठाणेदार सुरेश मटृटामी कोर्ट पैरवी म्हणून पो.हवालदार गुरुदास गेडेकर व पोलीस शिपाई नवनाथ सिदने यांनी पुढाकार घेऊन साक्षीदार यामध्ये समन्वय साधून योग्य साक्ष- पुरावे कोर्टासमोर सादर होन्यासाठी अतोनात प्रयत्न व परिश्रम करून गुन्हयात दोषसिद्धीची उल्लेखनीय कामगिरी केली व सदर पोलिस तपास मा .पो. अधीक्षक भंडारा जिल्हा वसंत जाधव, पोलीस नअधीक्षक श्री. अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात केलेला आहे .