समृद्धी महामार्गावर अवैध गुटखा वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
*समृध्दी महामार्गावर अवैध गुटखा वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई*
*आयशर ट्रकसह 69,28,000 रू किंमतीचा मुद्देमाल जप्त*
मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत . संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार विजय पवार, अभिजीत अरकल, अरूण गांगुर्डे, रणजीत जाधव, अजिनाथ पाखरे, विशाल तनपुरे, बाळासाहेब गुंजाळ, दिपक जाधव अशांचे पथक तयार करुन अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 24/10/2026 रोजी पथक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, समृध्दी महामार्ग येथून गुटखा व पानमसाल्याने भरलेला आयशर ट्रक क्रमांक डीडी-01-एए-9544 मधुन वाहतुक करीत आहेत.पथकाने मिळालेली माहिती श्री.किरण धन्यकुमार जगदाळे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, अहिल्यानगर यांना सांगीतली.त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी पंचासह नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर सापळा लावून थांबले असता, बातमीतील आयशर ट्रक मिळून आल्याने त्यास थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा, सुगंधीत तंबाखु मिळून आल्याने वाहन चालक 1) दिनेश रामचंद शर्मा, वय 47, रा.घर नं.472 बी, द्वारकापुरी, इंदौर, राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेतले.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीचे कब्जातून 27,00,000/- रू किं.त्यात प्रिमीयम राजनिवास सुगंधीत पानमसाला 18,000 पाकीट, 17,28,000/- रू किं.त्यात सुगंधीत तंबाखु 18,000 पाकीट व 25,00,000/- रू किं त्यात आयशर ट्रक क्रमांक डीडी-01-एए-9544 असा एकुण 69,28,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून आरोपीविरूध्द कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुरनं 484/2026 बीएनएस कलम 123, 223, 274, 275, 3(5) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल केला.
वरील कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.








