*काटोल येथे कामगार दिनानिमित्य कॉमरेट मधुकर मानकर व उदाराम चरडे यांना वाहिली श्रद्धांजली*

काटोल:-काटोल येथील न प समोरील कामगार मैदानावर 1मे कामगार दिनाचा दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नेते भिमराव बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली तर किसान सभेचे नागपुर जिल्हा सचिव अरुण वनकर कॉमरेट, डॉ युगल सायलु अंगणवाडी संघटनेच्या नेत्या ज्योती अन्डरसहारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे, शेतकरी कामगार पक्षाचे न प चे माजी विरोधी पक्ष नेते संदीप वंजारी ,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे ,ज्येष्ठ नागरीक समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव मेहर.न प सफाई कर्मचारी युनियनचे नरेश सारवाण, कॉमरेट मनोहर कौरती प्रा विरेंद्र इन्गडे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशराव देशभ्रतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळेस कामगार ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व काटोलात पूर्ण आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातुन शेतकरी शेतमजूर कामगारांची चळवळ राबवून त्यांचे अनेक प्रश्न सोडवून देण्यासाठी सतत काम करणारे  कॉमरेट भाई मधुकर मानकर व भाई उदाराम चरडे यांच्या झालेल्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानंतर कॉमरेट वामनराव धुर्वे यांनी क्रांतिकारी गीते सादर केली व अरुण वनकर ,डॉ सायलु ज्योती अन्डरसहारे, दिगांबर डोंगरे ,संदीप वंजारी ,विरेंद्र इंगळे नरेंद्र डोंगरे यांनी उपस्थित कामगार बांधवांना मार्गदर्शन केले.
संचालन जगदीश मानकर यांनी तर प्रास्ताविक मनोहर कौरती यांनी तर आभार नरेंद्र चरडे यांनी मानले.

यावेळी मंदा डोंगरे ,कुमुद नोकरीया, मनिषा उईके ,ज्योती रक्षित, दुर्गा नाईक, मिनल सोमकुवर ,मनोरमा यूवनाते, प्रतिभा उमप ,सुरेखा ठाकरे, वहिदा पठाण ,अर्चना सुरजुसे, सरीता डान्गोरे ,मंगला दुर्गे.नंदा सोमकुवर, लता जाधव ,रुपाली डफर, प्रणिता खोडे, बेबिबाई मानकर ,चित्रा मानकर ,देवाका कावळे ,शकुंतला मलवे ,शुभांगी बांगर, कांता देशभ्रतार, अर्चना बोबडे, माया अडागडे ,कविता घोरमाडे ,ममता पोहरकर, शिला शेंडे ,दिगांबर भगत, दौलत बगडे, श्याम महानंदे, शंकर काळभांडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स मदतनीस महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.