मेहकर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे!

मेहकर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे!

तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचा आवाज दाबल्या जात आहे. ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या ऐकून घेतल्या जात नाहीत, ऐकून घेतल्या तर वेळेत कार्यवाही केल्या जात नाही. मेहकर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना आज पर्यंत कधीच टिए डीए, अल्पोपहार खर्च, प्रशासकीय खर्च दिला जात नाही.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना तालुक्यात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे.

तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना गावातील राजकारणाचा त्रास सहन करावा लागतो, वेळेत मजुरांना मजुरी अदा करण्यासाठी जिल्ह्याला पुरस्कार मिळाला आहे, त्यामध्ये ग्रामरोजगार सेवकांचा मोलाचा वाटा आहे.

तरी सुद्धा ग्रामरोजगार सेवकांना सनासुदिच्या दिवसात सुद्धा वेळेवर मानधन न देणार्या कर्मचारी यांची चौकशी केली जात नाही, तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये तेथील सरपंच ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाच्या चेकवर सही करत नाहीत, त्यांच्या बाबतीत कधीच माननीय तहसीलदार तथा कार्यक्रम अधिकारी रोजगार हमी योजना मेहकर यांचेकडे तक्रार केली जात नाही, किंवा माहिती दिली जात नाही. उलट ग्रामरोजगार सेवकांना संबंधित ग्रामपंचायत स्तरावर त्रास दिला जात आहे.

ग्रामरोजगार सेवकांचे मानधन त्यांच्या वैयक्तिक खात्यात थेट जमा होणे गरजेचे आहे, त्यामुळे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या समोर हात जोडून मानधन देण्यासाठी विनंत्या करण्याची गरज पडणार नाही.

दिल्ली 91न्युज अपडेट प्रतिनिधी सोनी शर्मा बुलढाणा महाराष्ट्र.