काटोलमध्ये मार्केट शाळा कॉलेज कळकळीत बंद

मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री राज्यपाल यांना संविधान बचाव समितीचे पदाधिकारी यानी, दिगांबर डोंगरे हर्षद बनसोड विजय डहाट शब्बीर शेख सुनिल नारनवरे बंडु गजभिये ललिता दुपारे मिनल सोमकुवर मिना पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. 

राज्यसभेत अमीत शाहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत फॅशन म्हणून केलेला अपमान हा संपुर्ण देशाचा अपमान आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाही तर देशाची ऊर्जा आहे. भाजपला संविधान बदलविण्याकरीता ४०० सिटा दिल्या नाहीत, म्हणून संविधान बदलु शकले नाही. हा राग असल्यामुळे व ई व्ही एम च्या विरोधात देशात वातावरण निर्माण झाले होते. म्हणून त्यांनी वन नेशन एक इलेक्शन हा विषय आणला त्याला देशातील जनतेने नाकारले आहे. या विषयावरून लक्ष वळविन्याकरिता असे वक्तव्य अमीत शाहा यांनी केले. या विरोधात संपूर्ण देशात आंबेडकरी जनतेच्या वतीने आंदोलन केले जात आहे. तेव्हा अमीत शाहानी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. 

परभणी प्रकरणात ऍड. सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलिसांनी केलेली हत्या व दलित वस्तीवर केलेला हमला यात शेकडो बांधव जखमी झाले हा अन्याय पोलिसांनी केला व संविधानाचा केलेला अपमान हा देश कधीही सहन करणार नाही, शहीद अडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्यावी व कुटुंबाला एक कोटी ची मदत करावी त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी करण्यात आली.त्यावेळी अध्यक्षीय भाषणात डोगंरे बोलत होते. मुस्लिम समाजानी एकतेचा संदेश दिला. मोर्चा काटोल च्या मुख्य मार्गाने फिरुन शेवट त्यांचे सभेत रुपांतर झाले. 

 डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभेत माजी गृहमंत्री अनिलबाबु देशमुख,यांनी भेंट दिली. प्रहार चे आशिष जयस्वाल , संचालन हर्षद बनसोड यांनी तर आभार विजड डहाट यांनी मानले यांच्यासह हजारो मोर्चेकरी उपस्थीत होते.