सभापती म्हणून जनतेचे जनसेवा करून प्रेमाची परतफेड करण्याचा मानस - संजय डांगोरे
1.
काटोल :- जिल्हा परिषद-पंचायत समितीचा कार्यकाळ नुकताच संपलेला असून काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांचा सुद्धा कार्यकाल नुकताच संपलेला आहे.यावेळी त्यांनी आपले भावनिक आभार व्यक्त केले. पंचायत समिती रिधोरा पंचायत समिती सर्कल मधून विदर्भात सर्वात जास्त फरकाने निवडून येणारे तथा काटोल पंचायत समितीचा कार्यभार व्यवस्थितपणे सांभाळणारे संजय डांगोरे यांनी नुकतेच मतदारांचे आणि सर्व पक्षीय मान्यवरांचे आभार सुद्धा त्यांनी व्यक्त केले.
काटोल पंचायत समिती चा कार्यभार सांभाळताना अनेक अडचणी जरी असल्या तरी सक्षमपणे अनेक समस्या सोडवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि पुढील काळात काटोल पंचायत समितीचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपला पूर्ण वेळ देऊन त्यांनी पूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडले.
काटोल पंचायत समितीने पंचायत राज अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि विभागामध्ये सुद्धा नाव केलेले आहे .
राजकीय घराने नसलेले परंतु समाजसेवा ठासुन भरलेले संजय डांगोरे यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याची पूर्ण पराकास्ट त्यांनी केलेली आहे.
डार्क झोन, पांधन रस्ते, घरकुल प्रश्न, जाम प्रकल्पाचे प्रश्न, जिल्हा निर्मीतीआदी प्रश्न वरिष्ठ सभागृह मध्ये मांडून किंवा वरिष्ठापर्यंत पोहचवण्यात किंवा ते प्रश्न उचलून धरण्याची त्यांच्यामध्ये जी कसब आहे, त्यामुळे पुढील काळात नक्कीच त्यांना यथोचित यश मिळेल. असे अनेक मान्यवरांनी त्यांच्याबद्दल विचार व्यक्त केले.
काटोल पंचायत समितीचे सभापतीचा कार्यभार सांभाळताना ज्या ज्या व्यक्तींनी अधिकारी ,पदाधिकारी कर्मचारी , पत्रकार, मित्र, हितचिंतक यांनी सहकार्य केलं त्यांचे संजय डांगोरे यांनी आभार व्यक्त केले, आणि पुढील काळात जनतेची सेवा सतत करत राहण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला.