काटोल येथे कलावंताची भजन स्पध्रेचे उद्घाटन - मा. सभापती संजयजी डांगोरे यांच्या हस्ते

1.

(काटोल प्रतिनिधी):-  नागरिक सुधारमंडळ काटोल यांच्या वतीने श्री गणेश मंदिर धंतोली काटोल येथे दिनांक एक तथा दोन फरवरी च्या दरम्यान अनेक कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले आहे. 

 आज जिल्हास्तरीय लोक कलावंताची भजन स्पर्धा चे मंजुळाबाई वानखडे बहुउद्देशीय संस्था काटोल यांच्या पुढाकाराने भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जवळपास २०भजन मंडळ स्पर्धाकांनी भाग घेऊन त्यांना योग्य बक्षीस देण्यात येणार आहे .या जिल्हास्तरीय लोक कलावंताची भजन स्पर्धेचे आणि जयंती उत्सव समारंभाचे काटोल पंचायत समितीचे मा. सभापती श्री संजयजी डांगोरे यांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले . 

यावेळी संजयजी डांगोरे यांनी कलावंत हा समाज जागृती करनारे एक कलाकार असून, त्यांचा येथोचित सन्मान व्हायला पाहिजे असे उद्गार त्यांनी व्यक्त केले . 

या उद्घाटन प्रसंगास माननीय संजयजी डांगोरे यांच्या समवेत नरहरी कात्पुरे सर, नथुजी अतकर्णी सर ,राजू टाकरखेडे सर, माधवरावजी चौधरी , धोपाटे सर, खळगोतकर सर यांची उपस्थिती होती. जिल्हा स्तरीय लोककलावंताची भजन स्पर्धेचे आयोजक श्री रवीभाऊ वानखडे मुख्य संयोजक मंजुळाबाई वानखडे बहुउद्देशीय संस्था काटोल यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या भजन स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून संतोषजी ठोसर तथा श्रीमती राखुंडे मॅडम यांची उपस्थिती होती .

या कार्यक्रमांमध्ये तालुक्यातील प्रमुख असंख्य भजन मंडळींनी सहभाग घेतलेला होता.