श्रीरामपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर अमृत फेज टू या कामांना आज नगर विकास विभाग व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
श्रीरामपूर ( प्रतिनिधी )- श्रीरामपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर अमृत फेज टू या कामांना आज नगर विकास विभाग व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी अमृत फेस टू च्या कामांना पूर्वीच मंजूर झालेल्या या कामाच्या डी पी आर ला जानेवारी 2023 मध्ये 178 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता मिळाली होती तेव्हापासून आमदार लहू कानडे सातत्याने मंजुरीसाठी मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्याकडे प्रयत्न करीत होते शहरातील वाढती लोकसंख्या व पुढील पंचवीस वर्षासाठी आवश्यक श्रीरामपूर वाशी यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन अमृत फेस टू तयार करण्यात आलेले आहे यामध्ये मिलत नगरच्या मातीतलावाची क्षमता वाढ व संपूर्ण काँक्रिटीकरण हा मुख्य भाग आहे जुने जल शुद्धीकरण केंद्रऐवजी नवीन 25 एम एल टी चे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे त्यासाठी नवीन दोन जलकुंभ ही बांधण्यात येणार आहे तसेच शहरातील सर्व जुन्या जलवाहिन्या डिस्ट्रीब्यूरीज बदलून नवीन टाकण्याचा त्यात समावेश आहे असे आमदार लोक कानडे यांनी विधानमंडळातून ही माहिती दिली श्रीरामपूरवाशाची पाण्याची गरज लक्षात घेऊन अमृत फेस टू ला प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आमदार कानडे यांनी नगर विकास मंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत
......