*राष्ट्रपतीच्या नावे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन :-गोंडवाना ग. पार्टी*
काटोल : 22 फरवरी ला संपूर्ण भारतात पेनवाशी गोंडवाना रत्न दादा हिरासिंग मरकाम ग्राम गुरुसिया जिल्हा कोरबा छत्तीसगड राज्यात दादा हिरासिंग मरकाम यांच्या पुतळ्याचे स्थापना करण्यात आले होते परंतु काही समाजातील अज्ञानी व्यक्तीने 17 फरवरी 22 ला मूर्तीला तोडून जी विटंबना केली या दृश्याला पाहून समाजात आक्रोश निर्माण झालेला आहे.
या महानव्यक्तीने समाजाविषयी संपूर्ण जीवन समाज सुधारक व जागृत करण्याचं कार्य दादा हिरासिंग मरकाम यांचे समाजाविषयी त्यांच्या या कार्याला पाहून सुवर्णपदक समाज सुधारक म्हणून ' गोंडवाना रत्न ' व लाईफ टाईम अचीवमेंट भारत सरकारने सन्मानित करण्यात आलं , जोपर्यंत मूर्ती तोडणार्यास भा. द. वि. चे कलम 124 (क) 295 (क) 153 (क) 427 नुसार आरोपीस कठोर शिक्षा होणार नाही तोपर्यंत समाजातील जे व्यक्ती दादा हिरासिंग मरकाम यांच्या विषयी प्रेम व आस्थाशी जुडलेले आहेत ते व्यक्ती शांत बसणार नाही. व या निवेदनाद्वारे महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नई दिल्ली व महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी काटोल त्यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष मारोती सर्याम, कार्याध्यक्ष गोपीलाल उईके रिपाईचे महाराष्ट्र संघटक भीमराव बनसोड, यादवराव आहाके माजी जिल्हा परिषद सदस्य, शेवंताबाई दुर्वे अंबाडा शाखाध्यक्ष बाबाराव तागडे आरपीआय तालुकाध्यक्ष मनोज पेंदाम माजी नगरसेवक प्रमोद इरपाची ,शामराव कौरती, वसंतराव सलाम,प्रल्हाद तागडे, मधुकर मरस्कोल्हे ,राजहंस सलाम, विजू डाहाट आदी उपस्थित होते.