काटोल नरखेड स्टेशन वर रेल्वे थांबे पूर्ववत होणार आंदोलनकाऱ्यांना दूरध्वनी वरून प्रत्यक्ष दिलासा-मा.मंत्री रावसाहेब दानवे

1.

काटोल :- नरखेड ,काटोल तालुक्यातील लोकांकरिता रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता मा.आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे,  चरणसिंग ठाकूर उपाध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रा. यांच्या नेतृत्वाखाली काटोल रेल्वे स्टेशन येथे सर्व सुपर फास्ट गाड्यांचे थांबा काटोल नरखेड स्टेशन वर पूर्ववत सुरू करण्याकरिता धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आमदार रावसाहेब दानवे यांच्याशी दूरध्वनीवरून बावनकुळे साहेबांनी संपर्क साधला असता लवकरच रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून लवकरात लवकर मागणीची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच काटोल स्टेशन मास्टर श्री. के.डी. परमाल यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार सुधीर पारवे, आदर्श पटले, दिनेश ठाकरे, किशोर रेवतकर, संदीप सरोदे, पार्वताबाई काळबांडे जिल्हा परिषद सदस्य, उकेश चव्हाण, दिपक केने, रमजान अन्सारी, हेमराज रेवतकर, किशोर गाढवे, विजय महाजन शहर अध्यक्ष, श्यामराव बारई, हेमंत कावडकर, दिलीप ठाकरे, सोपान हजारे, योगेश चापले, प्रमोद धारपुरे, अशोक काळे, शत्रुघन राऊत, भरत पटेल, गोलू भस्मे, भूषण भोयर, अनिकेत अंतुलकर, राजु डंबाळे, लक्ष्मीकांत काकडे, शुभम परमाल, चैतन्य भजन, प्रकाश देशभ्रतार, जयस भाई देसाई, फत्तु भुतडा, कोमल देशमुख, प्रतिभाताई गवळी, सविताताई काळे, कल्पनाताई नागपुरे, विद्याताई कावळे, परमानंद ढोणे, दिलीप तांदळे, प्रफुल गजबे आणि काटोल नरखेड तालुक्यातील अनेक भाजपा कार्यकर्ते व व्यापारी मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.