*"दक्षिण भारत जैन सभा १०० वे महाअधिवेशन" (त्रैवार्षिक) नेमिनाथ नगर सांगली येथे संपन्न.*
बी पी एस राष्ट्रीय न्यूज नेटवर्क सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
सांगली.- दि.१५-०५-२०२२ रविवार रोजी नुकतेच दक्षिण भारत जैन सभेचे १०० वे महाअधिवेशन नेमिनाथ नगर सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या महाअधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी "अहिंसा परमो धर्म" जैन धर्माचे ब्रीद वाक्य "जगा आणि जगू द्या" या तत्वांचे आचरण करून संस्कृतीशी एकरूप झालेल्या जैन समाज यांच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न प्रधान्य सोडवले जातील असेही पवार यांनी ह्या १००व्या महाअधिवेशनात म्हणाले.
दक्षिण भारत जैन सभेची स्थापना सुमारे एकशे १२३ वर्षा पूर्वी झाली असून क्रांतिकारी नागरिकांच्या या सांगली जिल्ह्यात हे दक्षिण भारत सभे चे १००वे अधिवेशन होत आहे ही एक आपल्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे असेही ते म्हणाले.
अहिंसेचे आचरण करून "जगा आणि जगू द्या" या तत्त्वांचा आचरण करणारा जैन समाज नेहमीच अशा कल्पनांचा नवीन विचार करत असतोव अग्रेसर असतो.
भविष्यात शिक्षण व्यवसाय उद्योग यामध्ये तरुणांना वाव मिळावा यासाठी या दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या हस्ते व माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे त्यांना शिक्षक सेवक पुरस्कार व स्व. बापूसाहेब बोरगावे यांना जीवनगौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या महाकार्यक्रम सोहळ्यास सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री श्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री श्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री श्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री श्री सतेज पाटील, माजी खासदार श्री प्रकाश हुक्केरी, माजी खासदार श्री राजू शेट्टी, आमदार श्री अरुण लाड, आमदार श्री प्रकाश आवाडे, आमदार सुमनताई पाटील, आमदार श्री सुरेश खाडे, आमदार श्री अभय पाटील, आमदार श्री सुधीर गाडगीळ, आमदार श्री अनिल बाबर, महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी, माजी मंत्री श्री कल्लाप्पाअण्णा आवाडे, माजी महापौर श्री सुरेश पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी महाराष्ट्र व कर्नाटक मधून आलेले श्रावक आणि श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.