"अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स सत्कार "

"अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स सत्कार " करोना काळामध्ये काम केलेल्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांचा वैजापुरात दिनांक १३ मार्च रोजी सत्कार करण्यात आला. 
  'निर्मल इन्स्टिट्यूट' ने तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स , विविध रुग्णालयातील परिचारिका यांचा महिला दिनाच्या निमित्ताने सेवा धर्म प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा  शिल्पा परदेशी, मुख्याधिकारी भागवत बिघोत, ए पी आय गोरक्ष खरड, धोंडीरामसिंह राजपूत, रेव्ह. फादर संजय ब्राह्मणे, रेव्ह. फादर मोहन, नॅन्सी रोद्रीग्ज, मार्गारेट रिब्रेटो, सिस्टर लिलीयेन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अश्विनी बरकसे, माया म्हस्के, शेख रुकसाना निवृत्त शिक्षिका मार्गारेट बोर्डे यांचा विशेष गौरव करण्यात आला. 
      वक्त्यांनी महिला सबलीकरण व आत्मनिर्भरता यावर वक्तव्य करुन स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.               
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया बंगाळ शितल त्रिभुवन व इरफान सय्यद यांनी केले. याप्रसंगी दीपक बरकसे, ज्ञानेश्वर शिरसाठ उपस्थित होते.