महाराष्ट्र च्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील डिग्रस व बारागावनांदूर शिवारातून मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू सुरूच सचिन पवार ची रिपोर्ट
डिग्रस व बारागावनांदूर शिवारातून चोरटी वाळू मोठ्या प्रमाणात सूरू आहे वारंवार ही वाळू सुरु आहे असे व्हीडीओ पाठवून देखील यावर प्रशासन कोणतीही कारवाही करत नाही
या वाळू माफिया ला कुनाचा हात आहे येथील नगर - मनमाड हायवे चे अंतर वाळू चोरीपासून तीन ते चार कि.मी. पर्यंत आहे तसेच राहुरी तहसिल कार्यालय येथून पाच कि.मी. आहे
प्रशासन या चोरट्यावाळू वर कारवाही करण्यास निघाले कि लगेच वाळू माफिया चे गुप्त हेर यांना खबर देतात व या अधिकार्यांना हायवे रोडवरूनच गोड बोलुन पाठवून दिले जाते
या वाळू चोरांवर प्रशासन काही कारवाही करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे येथील स्थानिक नागरीक ही बेजार झाले आहेत.