*श्रीरामपूर- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२२ एकता समिती तर्फे विविध कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन.*

श्रीरामपूर- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२२ एकता समिती तर्फे विविध कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन.* BPS Live News Shrirampur-2022-10
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त एकता समिती, श्रीरामपूर तर्फे वकृत्व, निबंध व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती एकता समितीचे अध्यक्ष रितेश एडके व स्पर्धा समिती प्रमुख प्रविण कुमार साळवे, अशोकराव दिवे, राजेंद्र हिवाळे, सावंत साहेब व अमोल सोणवने यांनी दिली आहे.
        यामध्ये जिल्हास्तरीय खुल्या वकृत्व स्पर्धा दि. १४ एप्रिल २०२२, विषय " डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार " ठरविण्यात आलेल्या वेळेतच आपले विचार व्यक्त करावयाचे आहे. जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धा " शिक्षणाचे बाजारीकरण " या विषयावर दि. १८ एप्रिल पर्यंत पोस्टाने अथवा समक्ष अधिक्षक शंभुक विद्यार्थी वसतिगृह वार्ड ३, श्रीरामपूर, जि.अहमदनगर या पत्त्यावर पाठवावेत तर जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा  विषय " आपल्या संकल्पनेतील महामानवाचे रांगोळी चित्र " दि. १३ एप्रिल २०२२, वरील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकडून नाव नोंदणी फी घेतली जाणार नाही. या स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय येणाऱ्यास आकर्षक रोख रक्कम व उत्तेजनार्थ बक्षीस व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. तेंव्हा वकृत्व, निबंध व रांगोळी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व करोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती, मात्र यंदा भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या वतीने मार्गदर्शक सुचनांवरुन काढण्यात येतील त्यांचे आरोग्याच्या नियमांचे पालन करुन हा जयंती उत्सव साजरा करुया असे आवाहन विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती एकता समितीचे अध्यक्ष, स्पर्धा समिती प्रमुख व पदाधिकारी, सदस्यांनी जयंती साजरी करणा-या जनतेला केले आहे. BPS Live News Reporter...... Prakash Nikale.. Shrirampur.