डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये बाल दिनाच्या निमित्ताने क्रीडा दिन साजरा

डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये बाल दिनाच्या निमित्ताने क्रीडा दिन साजरा

श्रीरामपूर --: 
  श्रीरामपूर येथील डि पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कुल, श्रीरामपूर ( स्टेट बोर्ड ) येथे १४/११/२०२२ सोमवार रोजी  बालदिनाच्या निम्मिताने बालदिन व क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी दिलीप गजानन कांबळे सर ( कबड्डी राष्ट्रीय पंच ) व भानुदास शिरोळे ( क्रीडा अधिकारी श्रीरामपूर तालुका) हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलीन, फा. थॉमसन, कांबळे सर, शिरोळे सर, रवींद्र लोंढे सर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशराज साठे व आयेशा शेख यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत नीता मॅडम व एलिझाबेथ मॅडम यांनी केले. इयत्ता तिसरी व आठवीच्या मुलांनी विविध कार्यक्रम सादर केले. मालन मोहन मॅडम व शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप निबे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाकरिता स्नेहलता नेवेवाणी,रीता कांबळे,आशा गायकवाड, सुनिता सोनवणे, बिना कदम गणेश पवार, विवेक शेलार विकास वाघमारे व सुनील बोरगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.