सावनेर येथून बेपत्ता असलेल्या आजीला शोधण्यात हितज्योती आधार फाउंडेशनला आले यश....
सावनेर येथून बेपत्ता असलेल्या आजीला शोधण्यात हितज्योती आधार फाउंडेशनला आले यश.... राहुल सोनवने पोलीस निरीक्षक बी .पी .एस लाईव्ह न्युज दिल्ली नागपूर:-पारशिवनी हे रात्री ग्रस्तवर असताना पालोरा गावाजवळ त्यांना एक आजी रस्त्याने पायदळ जातांना दिसून आली, त्यांनी लगेच तिला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आले, आजीची विचारपूस केली असता... तिला बोलता येत नसल्याचे प्राथमिक चौकशीत लक्षात आले... त्यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना आजीला आश्रमात दाखल करण्याकरिता आश्रम विचारले,
आश्रमात दाखल करण्याचे प्रोसेस सुरू होते.. सदर आजीचा फोटो व्हाट्सअप ग्रुपला हितेश यांनी विविध ग्रुपला व्हायरल केला.. तो फोटो सावनेर येथील अभिषेक भगत यांना दिसताच, त्यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना संपर्क केला आणि आजीला ओळखत असल्याचे सांगितले... लगेच पारशिवणी येथे त्याचा नातेवाईकांसोबत जाऊन आजीला कायदेशीर प्रोसेस करून... नातेवाईकांच्या स्वाधीन केले..यावेळी आजीने नातवाला पाहून आजीला अश्रू न कळत निघाले,यावेळी पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या कार्याची प्रशंशा केली यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, रोशन काळे, तुषार महल्ले.. आदी उपस्थित होते