*सोनई येथे झालेल्या प्राणघातक हल्यातील आरोपी हिंडताय मोकाट आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी पो.उ.अधिक्षकांना दिले निवेदन*

आज सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले सोनई येथील संजय नितीन वैरागर या तरुणावर काही जातीवादी व्यवस्थेने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा निषेध म्हणून आज आपण निवेदन घेऊन डी वाय एस पी शिरीष वमणे साहेब त्यांना निवेदन दिले

एक आरोपी अटक आहे उर्वरित दहा आरोपी फरार आहेत जर त्यांना लवकरात लवकर अटक झाली नाही तर सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व आंबेडकर चळवळीतील बहुजन विचारधारेचे सर्वच चळवळीतील कार्यकर्ते २५ तारखेला नगर औरंगाबाद रोड घोडेगाव येथे रास्ता रोको करणार आहेत त्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आलीत्यावेळी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ शिंदे ,राज्य प्रवक्ते निलेश भाऊ जगधने , राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड, तालुका कार्याध्यक्ष सचिन नन्नवरे, एडवोकेट कुमार भिंगारे, सामाजिक कार्यकर्ते संजय संसारे, वाहतूक चे जिल्हाध्यक्ष बाबा आडगळे, वाहतूक तालुका अध्यक्ष श्याम नन्नवरे, गुहा शाखाध्यक्ष अमोल भांड, सचिन शिंदे आधी कार्यकर्ते उपस्थित होते