*लाँयन्स क्लब सावनेर जळतोय समाजातील बांधीलकी आदासा वृद्धाआश्रम येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर 60 वृद्द्धांनी घेतला लाभ*

1.

*लॉयन्स क्लब सावनेर जपतोय सामाजिक बांधिलकी*

*आदासा वृध्दाश्रम येथे “आरोग्यनेत्र तपासणी शिबीर" 60 वयोवृद्धांनी घेतला लाभ*

BPS Live news N-Delhi

सावनेर - *29 मार्च रोजी इंटरनेशनल लॉयन्स क्लब, सावनेर व्दारे मातोश्री वृध्दाश्रम, आदासा येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. लॉन्यस क्लब, सावनेर व्दारे सदर कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. छत्रपती मानापुरे यांनी 60 च्या वर रुग्णांना रक्त शर्करा,ई.सी.जी., रक्तदाब, दमा, लोहचाचणी, अशक्तपणा, अंगदुखी, इत्यादीच्या चाचणी व निदान केले. तसेच कार्यक्रमाचे प्रभारी दृष्टीतंत्रज्ञ ला रुकेश मुसळे यांनी सर्व वृध्दांचे डोळे तपासले असता 30 हुन अधिक रुग्णांना चष्मांची गरज, मोतीबिंदु तसेच काचबिंदु असल्याचे निदर्शनात आले.*

*विशेष म्हणजे शिबिरात गरजु वृद्ध रुग्णांना लॉयन्स क्लब सावनेर मार्फत मोफत औषधी वाटप करण्यात आले.*

*सदर कार्यक्रम मध्ये येणारा उन्हाळात वृध्दांनी आरोग्याची काळजी बददल सुध्दा वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. लॉयन्स क्लब, सावनेर चे अध्यक्ष अँड् अभिषेक मुलमुले यांनी प्रस्तावना व क्लब व्दारे भविष्यात सुध्दा वृध्दाश्रमाला आरोग्य विषयक सोई सुविधा पुरविण्याची ग्वाही देत वर्षभरात केलेले जनउपयोगी उपक्रमाची माहीती दिली व समाजबाऔधवांनी वृध्दाश्रम वासीयांन सोबत दिवाळी व वाढदिवस सारखे आयोजन करुण त्यांना पारिवारिक आभास द्यावा असे आव्हान याप्रसंगी केले.*

*कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचलन उपाध्यक्ष डॉ. शिवम पुण्यानी यांनी व आभार प्रदर्शन चार्टड प्रेसीडेंट वत्सल बांगरे यांनी केले व भविष्यात सुध्दा मातोश्री वृध्दाश्रम, आदासा चा सहयोग अशाच प्रकारे मिळेल अशी आशा व्यक्त केली.*

*या शिबिरात लायन्स क्लबचे प्रदेश अध्यक्ष लॉ. अवनीकांत वर्मा, लॉ. अनिता वर्मा व झोन अध्यक्ष लॉ डॉ. अरविंद बुटले यांनी भेट दिली व सर्व लॉयन्स सदस्यांना आपले व्यवसायीक कामातून वेळ काढून समाजाच्या भल्यासाठी सेवाकार्य करण्यास प्रोत्साहन दिले.*

*कार्यक्रमाचा यशस्वीते साठी क्लबचे कोषाध्यक्ष अँड् मनोजकुमार खंगारे, क्लबचे जॉइंट उपाध्यक्ष लॉ. किशोर सावल, लॉ अॅड. अन्वेषा मुलमुले, लॉ. पियुष झिंजुवाडीया, लॉ हितेष ठक्कर, लॉ प्रविण टोनपे व सर्व लॉयन्स सदस्य व मातोश्री वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक प्रदिप चंदनबाटवे व इतर गणमान्य अधिकारी आदींने परिश्रम घेतले*