कर्हेटाकळी परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांचे नुकसान
क-हेटाकळी परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांची नुकसान
शेवगाव प्रतिनिधी - यशवंत पाटेकर
दी.७. शेवगाव तालुक्यात क-हेटाकळी परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतामध्ये असलेल्या गव्हाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये गदेवाडी. चापडगाव. दहिगाव-शे .खानापूर .अंतरवाली. एरंडगाव. क-हेटाकळी.घोटण.तळणी.
रावतले. कोरडगाव या परिसरातील गावातील क-हेटाकळी परिसरात रामेश्वर दादासाहेब शेळके गट नंबर ४९ यांचे गव्हाचे खूप नुकसान झाले आहे तरी यांना त्वरित शासनाने मदत करावी अशी मागणी करीत आहे . उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे . काही भागात काढण्यात आलेल्या गहू तसेच हरभरा कांदा आंबा चिंच फळबागांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे अवकाळी पावसाची हजेरीने वातावरणात गारा निर्माण झाला आहे तापमान घट झाली आहे अगोदरच मागील अतिदृष्टीची भरपाई न मिळाल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे व आता उभ्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे सरकार मदत करणार का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे