*बार्शी नगरीमध्ये राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सव*

*बार्शी  नगरीमध्ये  राज्यस्तरीय  भगवंत  कृषी  महोत्सव*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

बार्शी.       बार्शी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवी निमित्त राज्यस्तरीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 9 ते 13 नोव्हेंबर असे पाच दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच याचा फायदा पाच ते सहा जिल्ह्यांना होणार आहे अशी माहिती सभापती रणवीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या महोत्सादरम्यान पावणे तीनशे ते तीनशे स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये कुक्कुटपालन, सौर ऊर्जा, शेतीतील अवजारे, शेतमाल साठवणूक, बाजारपेठ, पशुधन प्रदर्शन, पीक स्पर्धा, बचत गट महिला मेळावा अशा प्रकारचे प्रात्यक्षिक या महोत्सवा दरम्यान एकाच ठिकाणी होणार आहे त्यामुळे बार्शीकरांना याचा खूप फायदा होणार आहे असे दिसून येते.

तसेच या महोत्सव दरम्यान शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती देण्यासाठी उच्च स्तरावरील मान्यवर बोलवण्यात आले आहेत यात निश्चितच शेतकऱ्यांना लाभ होईल असे सांगण्यात येते.