अंघोळ करणाऱ्या शेतकरी महीलेचा व्हीडीओ काढणाऱ्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या स्थापत्य मिस्त्री वर राहुरी पोलसात गुन्हा दाखल विद्यापीठात खळबळ..

अंघोळ करणाऱ्या शेतकरी महीलेचा व्हीडीओ काढणाऱ्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या स्थापत्य मिस्त्री वर राहुरी पोलसात गुन्हा दाखल विद्यापीठात खळबळ..

राहुरी कृषी विद्यापीठात महीलेची छेड काढल्याने विद्यापीठ बांधकाम विभागाच्या स्थापत्य मिस्त्री विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन यामुळे विद्यापीठात खळबळ उडाली आहे , याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती कि म. फु.कृ.विद्यापीठ राहुरी येथे प्रशिक्षणा साठी आलेल्या महिलेला अंघोळ करताना व्हिडीओ काढल्याची तक्रार करण्यात आली आहे.

गणेश तुकाराम चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या मिस्तरी चे नाव असुन विद्यापीठ बांधकाम शाखा नेहमीच कोणत्याना कोणत्या वादात चर्चेत आले आहे सध्या विद्यापीठात प्रशिक्षण चालु असुन त्यात महिला शेतकरीही आहेत त्यांची राहाण्याची व्यवस्था शेतकरी निवास येथे केली आहे गुन्हा दाखल झालेला मिस्तरी गणेश चौधरी ह्याची शेतकरी निवासा इमारतीत देखभाली साठी नियुक्ती केली आहे

  बुधवार दि २० रोजी सकाळी महिला अंघोळीला गेली असता खिडकीतुन मोबाईल द्वारे चित्रकरण करण्याचा प्रयत्न केल असल्याचे तक्रारीत म्हटले आहे या संतप्त महिलेने वरिष्टांकडे तक्रार केली असता याची तात्काळ दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे या संतप्त महिलेने राहुरी पोलीसात धाव घेतली असता पोलीसांनी मिस्तरी गणेश चौधरी याचे विरुद्ध भा.द.वि. कलम ३५४ ड प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे

  यापुर्वीही विद्यापीठ बांधकाम विभाग कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असुन या विभागा विरुद्ध व विद्यापीठ अभियंत्या विरुद्ध अनेक तक्रारी प्रलंबीत आहेत  

    कोणतेही कागदपत्राची पुर्तता नसताना लाखो करोडो रुपयांच्या निविदा मर्जीतील ठेकेदारांना खिरापती प्रमाणे वाटल्या जात असल्याने राहुरी कृषी विद्यापीठ चांगालेच चर्चेत आले होते चुकिच्या कामाला पाठबळ दिले जात असल्याने विद्यापीठामध्ये नको त्या गोष्टी घडु लागल्याची चर्चा विद्यापीठ परसरात रंगली आहे विद्यापीठ अभियंत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक सामाजीक कार्यकर्त्यानी तक्रारी करूनही वरिष्ठ याची दखल का घेत नाही ? आसा सवाल पैदा होत आहे विद्यापीठ अभियंताने विद्यापीठाच्या

  सिंचन योजनेतही मोठा भ्रष्ठाचार केल्याचे उधड होऊनही विद्यापीठ अभियंत्यांवर कोणतीही कारवाई केली नाही ही आश्चर्याची बाब आहे या बाबत वरिष्ठांनी लक्ष घालावे अशी जनतेतून मागणी होत आहे.