तिष्टी बुजरूक येथे भागवतकथा ज्ञानयज्ञ सप्ताह ची सुरुवात....

Nagpur-1136

तिष्टी बुजरूक येथे भागवतकथा ज्ञानयज्ञ सप्ताह ची सुरुवात.... BPS LIVE NEWS NETWORK. नागपूर:-सालाबादा प्रमाणे यंदाही तिष्टी बुजरूक येथे समस्त ग्रामवासियांच्या सहकार्याने मोठ्या हर्षोल्हासात भागवत ज्ञानकथा सप्ताहाची *दिनांक २५/०२/२०२३ शनिवारी रोजी सुरुवात झाली भागवत कथा ज्ञान यज्ञाची परंपरा ही गेल्या दहा वर्षापासून येथे सुरू आहे. यातून समस्त ग्रामवासी भागवत कथेचे श्रवण करून संस्कारक्षम जीवन जगण्याचा प्रयत्न करतात यातून तरुण वर्ग नवीन पिढीला योग्य जीवन जगण्याची चालना प्राप्त व्हावी हा उद्देश आहे.यंदाचे भागवताचार्य ह.भ.प. श्री. उमेश महाराज जाधव ( नांदगाव खंडेश्वर जी. अमरावती) यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथेला आज प्रारंभ झाला. भागवत कथा सकाळ व दुपार अश्या दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे. तसेच दोन सत्रामंध्ये ह.भ.प. ईश्वर महाराज उईके,आळंदीकर यांच्या मुखारविंदातून ज्ञानेश्वरी पारायण सुरु आहे. सायंकाळी हरिपाठ व दररोज रात्री ०९.०० वाजता हरिकिर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.समस्त ग्रामवासियांच्या उपस्थितीत शनिवार ला कलश स्थापना व पुजा करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच बाहेर गावचे पाहुणे देखील मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते . यात प्रामुख्याने श्री गजाननराव तांदूळकर (तालुका अध्यक्ष मानव अधिकार सुरक्षा संघटना) मूळचे तिष्टी येथील रहिवासी यांनी देखील *भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह* या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली . रविंद्रजी खेडकर* . ( अध्यक्ष -मानव अधिकार सुरक्षा संघटना नागपूर जिल्हा *तथा* उपसंपादक सिटी इंडिया मराठी न्यूज ) तसेच राजूभाऊ नानवटकर (अध्यक्ष ग्रामीण नागपूर जिल्हा मानवाधिकार सुरक्षा संघटना नागपूर) हे यावेळी उपस्थित होते.