*दोन अज्ञात मोटर सायकल जळलेल्या बोरुजवाडा शिवारात आढळली*

Maharashtra-nagpur -1140

1 / 1

1.

दोन अज्ञात मोटर सायकल जळलेल्या बोरुजवाडा शिवारात आढळली.                                                                                                                                      BPS Live News                                               नागपूर :सावनेर गावाजवळ असलेले बोरूजवाडा शिवारातील रोडलगत असलेल्या झुडपात दोन अज्ञात मोटर सायकल जळलेल्या अवस्तेत आढळली. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या गाड्या कोणाचा आहे, व कोणी जाळली असावी, याबाबत उलट-सुलट

चर्चेला उधाण आले आहे,या विषयी अधिक माहिती अशी की सावनेर तालुक्यातील बोरुजवाडा शिवारात जळलेल्या अवस्थेत पडुन असल्याचे दिसून आले, त्यामुळे या घटनेची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्या शुभम पाचभावे यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना माहिती दिली असता, लगेच पोलीस निरीक्षक मारुती मुळक सर यांना माहिती देण्यात आली, यानंतर तातडीने पोलिस घटनस्थळी दाखल झाली, सदर गाड्या कोणाचा आहे व का जाळण्यात आली,या विषयी परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे त्यामुळं या गाड्या नेमक्या कुणाचा आहे हे पोलिस तपासनंतर उघड होईल पुढील तपास सावनेर पोलीस स्टेशन करीत आहे