शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तहात साजरी.

शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तहात साजरी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व मानवजातीचे युगपुरुष होते प्रा.सुधाकर आल्हाट ... 

आव्हाणे बु :- शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान गैत्तम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.सुधाकर आल्हाट म्हणाले डॉ.आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले हे महामानव कोणत्याही एका समाजाचे नव्हते तर ते सर्व मानव जातींचे युग पुरुष आहेत. व त्यांचे जीवनचरित्र प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. 

         यावेळी उपस्थित श्री.भारतराव वांढेकर, अशोक दातीर सर, दिलीप भालसिंग, दिनकर फुंदे, राजेंद्र शिरसाठ, गंगाधर भालसिंग, भीमराज शिंदे, पांडुरंग दातीर, विलास आल्हाट, रतन आल्हाट, डॉ.चंद्रहास भालसिंग, अर्जुन शिंदे, मोतीराम काळे, महेश दातीर, विठ्ठल जमधडे, आकाश शिरसाठ, विशाल शेळके, सतीश बळे, विठ्ठल गोधवणे, बाळासाहेब गाडगे, देवदान आल्हाट, भगवान आल्हाट, किशोर आल्हाट, मनोज आल्हाट, सुभाष आल्हाट, मछिंद्र आल्हाट इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.