विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवा निमित्त तांदळवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन व भिमराज सेना
यांच्या संयुक्त विद्यमाने
विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त तांदूळवाडी येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सव कार्यक्रमा निमित्त
मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत अभिवादन सोहळा होणार आहे आणि ज्या महापुरुषाने या देशातील समता, बंधूता व न्याय या तत्वावर आधारित लोकशाही प्रदान करून या देशातील विषमता नष्ट केली. महिलांसाठी कामगारासाठी देशाच्या आर्थिक धोरणासाठी आपला देह झिजवून या देशातील प्रत्येक नागरीकास आपले हक्क आणि अधिकार प्रदान केले आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनामुळे या देशाला जगविख्यात भारतीय संविधान देऊन त्यांनी या देशातील अस्पृश्यता नष्ट करून या देशासाठी महान असे कार्य केलेले आहे. अशा या महापुरुषाची जयंती साजरी करणे हे प्रत्येक भारतीय नागरीकाचे कर्तव्य आहे. यानिमित्त मंगळवार, दि. १४/४/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता अभिवादन केले जाईल. ११/३० वाजता मान्यवरांचे सत्कार केले जातील. दुपारी १२ वाजता अनाथ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले जाईल. १ वाजता मनोगत व्यक्त केले जाईल. आणि दुपारी २ वाजता स्नेहभोजन आणि समारोप होईल.अशा अनेक प्रकारच्या उत्सवाने जयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, ही विनंती.असे प्रतिपादन राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनच्या जिल्हाध्यक्षा. आणि भीमराज सेनेच्या जिल्हाउपाध्यक्षा यमुनाताई भालेराव यांनी केले आहे.








