लोहगाव येथे १३५ वा भीम जयंती उत्सव उत्साहात साजरा

लोहगाव येथे १३५ वा भीम जयंती उत्सव उत्साहात साजरा

लोहगाव येथे १३५ वा भीम जयंती उत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी : प्रसाद घोगरे | मो. ९३७०३२८९४४

लोहगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लोहगाव येथे भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जनसेवा मित्र मंडळ प्रणीत प्रज्ञासूर्य बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, लोहगाव यांच्या वतीने १४ एप्रिल रोजी प्रवरापरिसर, नेहरूनगर, तांबेंनगर, राधाकृष्णनगर येथे विविध सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व सत्कार समारंभाने झाली. त्यानंतर प्रमुख वक्त्यांनी आंबेडकर विचारांवर मार्गदर्शन करत सामाजिक समतेचा संदेश दिला. दुपारी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सायंकाळी लोहगाव फाटा ते प्रवरानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, या मिरवणुकीत भीमसैनिक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास लोहगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच प्रवरा परिसरातील भीमसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.