शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी शेवगाव तहसील येथे सावलीचे ठिय्या आंदोलन.
शेवगाव :- गेल्या अनेक महिन्यापासून तहसील कार्यालयातील शिधापत्रिका ऑनलाईन करण्याबाबतचे कामकाज पूर्णपणे बंद असल्याने दिव्यांगाचे सर्वच नागरिकांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी सावली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख व सावली चे सर्व पदाधिकारी यांनी पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख. उपाध्यक्ष संभाजी गुंडे. सचिव नवनाथ आवटी .कार्याध्यक्ष मनोहर मराठे. संघटक खालील शेख. अनील विघणे .भरत साळुंके. शिवाजी आहेर .सोशल मीडिया प्रमुख बाबासाहेब गडाख. शहर अध्यक्ष गणेश महाजन. उपाध्यक्ष सुनील वाळके. सचिव गणेश तमानके. विजय आंधळे .सुवर्णा देशमुख .महिला अध्यक्ष सोनाली चेडे. महिला शहराध्यक्ष चंद्रकला चव्हाण. निलोफर शेख. हिरा मिसाळ. यांच्यासह बहुसंख्येने दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयासमोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान तहसील कार्यालय मधील अधिकारी आंदोलनाकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याचे लक्षात आले दिव्यांग बांधवांची व्यथा पत्रकारांनी वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी यांना कल्पना दिली. त्यानंतर कार्यालयात हजर नसलेले अधिकारी प्रगट झाले.
पत्रकारांच्या या भूमिकेमुळे शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा प्रश्न मार्गी लागला शेवगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता मीनाताई कळकुंबे यांनी या आंदोलनाची दखल घेत फोनवर दिव्यांग बांधवाची चौकशी करून दिव्यांग बांधवाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक साळुंके व लिपिक बहुरे साहेब तसेच निवडणूक विभाग नायब तहसीलदार सुसरे यांनी आंदोलन करणारे दिव्यांगांना लेखी स्वरुपात तात्पुरता स्वरूपात साहेब यांची नियुक्ती करण्यात आली असून कायमस्वरूपी कर्मचारी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सावली दिव्यांग संघटनेच्या आंदोलनास यश मिळाले आहे.
शिधापत्रिका ऑनलाईन कामकाज असल्याने दिव्यांगा सह तालुक्यातील नागरिक हैराण झाल्याने शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेकडून लढा सुरू राहणार आहे लवकरच या अडचणीतून सामान्यांची सहसे होलपट थांबणार आहे.
चांद कादर शेख अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना शेवगाव.