जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आज जिल्हा परिषद खेडले परमानंद तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती, मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

         ज्यांनी आपल्या संस्काराने छत्रपतीं शिवरायांसारखे दैवत घडवले अशा स्वराज्य जननी जिजाऊ मा साहेब यांची जयंती उत्सव ग्रामस्थ खेडले परमानंद, प्राथमिक आरोग्य केंद्र , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान , यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

       यावेळी मुख्याध्यापिका सविताताई आव्हाड , सविताताई दरंदले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनाली संभाजी शिंदे, अंगणवाडी सेविका रंजनाताई राजाळे, सिंधुताई राजाळे, योगिताताई शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सिस्टर पुनम भुसारी, मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान चे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार संभाजी शिंदे, कृष्णा राऊत ,गणेश शिंदे, संदीप शिंदे, प्रमोद शिंदे, राहुल भुजबळ, ऋषिकेश भुजबळ, भाऊसाहेब राजळे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष निमसे सरांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.