पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी शिवसंग्रामचे नवनाथ विसरवाडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले.

पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी शिवसंग्रामचे नवनाथ विसरवाडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले.

पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी शिवसंग्रामचे नवनाथराव इसरवाडे यांनी दिले जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन.....!

*जीवितास धोका असण्याची दाट शक्यता असल्याने नवनाथराव इसरवाडे यांनी मागितला पोलीस बंदोबस्त....!

शेवगाव/प्रतिनिधी :- यशवंत पाटेकर 

शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील माजी सरपंच तथा शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी आपल्या स्वतःच्या जीवितास धोका असल्याने पोलीस बंदोबस्त मिळण्याकरिता अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे. सदरील अहमदनगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष तथा गदेवाडी गावचे माजी सरपंच नवनाथराव इसरवाडे यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे साहेब यांच्या पक्षाचे शेवगावचे तालुका अध्यक्ष म्हणून मी गेल्या पंधरा वर्षापासून काम पाहत असून पक्षाच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी आदींना न्याय देण्यासाठी वेळप्रसंगी काही समाजकंटक यांचे विरोधात काम करावे लागते. त्यामुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता आहे. व मी एका केस मध्ये साक्षीदार आहे. त्याचप्रमाणे माझे वर चार वर्षांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यात हल्ला झाला होता. त्यामुळे काही राजकीय पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून माझ्या जीवितास धोका असल्यामुळे मला पोलीस संरक्षण मिळावे. अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे तालुका अध्यक्ष नवनाथराव ईसरवाडे यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच सदरील निवेदनाच्या प्रती ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे साहेब, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहितीस्तव देण्यात आले आहेत.