भीमा कोरेगावची विजयी शौर्य गाथा आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देणारी- दिगांबर डोंगरे..

1.

काटोल:-  १जानेवारी १८१८ची भीमा कोरेगाव च्या ऐतिहासिक लढाईत पेशव्यांना चारोचित करून महार बटालियनच्या शुरू महार सैनिकांनी इतिहास घडविला, त्या इतिहासाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ साली भीमा कोरेगावला जावून उजाळा दिला. व खरा मर्द महार बटालियनच्या सैनिकांचा पराक्रमाची शौर्य गाथा जगासमोर आणला म्हणून ही शौर्य गाथा आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देणारी आहे, असे  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांनी, काटोल येथे समता सैनिक दलाच्या वतीने आयोजित २०६ व्या विजयी शौर्य गाथा दिनानिमित्य अभिवादन रैलीनिमित्य मत मांडले ,यानिमित्याने पंचशील बौद्ध विहार रेल्वे स्टेशन काटोल येथून ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्मारकापर्यन्त विजयी रैली समता सैनिक दलाच्या वतीने काढण्यात आला. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व विजयी स्तंभाला अभिवादन करण्यात आले.

यावेळी  सुरेश देशभ्रतार, देविदास घायवट ,सुधाकर कावळे, बळवंत नारनवरे कलंभा ग्राम पं सदस्य ,समता सैनिक दलाच्या सुजाता डबरासे, वर्षा निकोसे, नीलिमा बावणे ,संगीता गायधनी, धनश्री तिजारे ,लक्ष्मी शेंडे, वच्छला गायकी, अनिता वासनिक, सुनीता गोंडाने ,बेबी बोरकर ,मिना पाटील, वत्चला नागदेवे सुजाता वाहने, ममता वाहने, अर्चना मडके, मिना निकोसे ,माधुरी डोंगरे ज्योत्स्ना मडके. सुषमा सहारे ,अनिता सोनटक्के ,अनिता पाटील ,रमा गजभिये, इन्दुबाई पाटील, प्रधन्या डोंगरे, सुनंदा बागडे, मोना सोमकुवर, ज्योत्स्ना डभाळे, कमला शेंडे ,पौर्णिमा मून  यांच्यासह गुलाबराव शेंडे ,नीळकंठ गजभिये, श्रीधर सोमकुवर , तुकाराम देशभ्रतार. यांच्यासह मोठ्या प्रमाणात समता सैनिक दलाच्या. महिला भगिनी  व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.