अवैध वाळू वाहतुकीवर सोनई पोलीसांची कारवाई. बारा लाखांचा मुद्देमाल जप्त...
अवैध वाळू वाहतुकीवर सोनई पोलीसांची कारवाई. बारा लाखांचा मुद्देमाल जप्त...
नेवासा(वार्ताहर) -- सोनई पोलीसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. दि. २९ रोजी मिळालेल्या माहितीनुसार अंमळनेर येथील मुळा नदी पात्रातून वाळु वाहतूक सुरू असल्या बाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहिती च्या आधारे सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत कारवाई चे आदेश दिले होते. त्या मध्य रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या पोलीसांना मुळा नदी पात्रात एक विना क्रमांकाचे टेम्पो मध्ये चोरून वाळू भरत असताना वाहनासह मिळुन आला.पोलीसांना पाहताच त्यावरील चालकाने अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली.एक विना क्रमांकाचा टेम्पो व त्यामध्ये अर्धा ब्रास वाळू असा एकूण बारा लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस काॅस्टेबल प्रविण क्षिरसागर यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ३४२/२०२६ बिएन एस चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक देवीदास आव्हाड हे करत आहेत.








