स्त्रियांच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार ,विहार . व शुद्ध विचार गरजेचे डॉ .गौरि प्रकाश पवार .

स्त्रियांच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार ,विहार . व शुद्ध विचार गरजेचे डॉ .गौरि प्रकाश पवार .

 पुर्वीच्या काळात साथीचे रोग उद्भवायचे. पण आत्ताच्या युगामध्ये धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृरदयविकाराचे रोग मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. मधुमेह व रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या संख्येत जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. या धकाधकीच्या जिवनशैलीमुळे स्त्रीया आपल्या आरोग्याकडे दुरलक्ष करतात. यामुळे स्त्रीयांना कर्करोगासारख्या मोठ्या आजाराला सामोरे जावे लागते. आपल्या देशातील स्त्रीयांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आहे. स्त्रीयांचे आरोग्य सुदृढ बनवायचे असेल तर सकस आहार, विहार सुधरवणे व विचार शुध्द ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवांकुर गृपच्या संचालीका, स्त्रीरोगतज्ञ व जनरल सर्जन डॉ. गौरी पवार यांनी केले.

 महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, पदव्युत्तर कृषि महाविद्यालय व डॉ अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन शिवांकुर गृपच्या सांचालीका व स्त्रीरोगतज्ञ डॉ. गौरी प्रकाश पवार बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन योगगुरु प्रा. डॉ. बापुसाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरूंचे विशेष कार्य अधिकारी तथा आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान, डॉ. संगीता भोईटे, डॉ. रीतु ठाकरे आणि क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. महावीरसिंग चौहान यांनी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचा संदेश उपस्थितांना दिला. संदेशामध्ये ते म्हणाले स्त्रीयांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी हिमोग्लोबीन वाढविण्याची गरज आहे. यासाठी स्त्रीयांनी चौरस आहाराचा अवलंब करावा. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ. बापुसाहेब पाटील म्हणाले स्त्रीयांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आपल्या दिनचर्यमध्ये योगा, प्राणायाम आणि शड्रस आहाराचा आंतर्भाव करावा. यावेळी त्यांनी योगा, प्राणायाम, आहाराचे महत्व व वेळा, आहाराचा प्रकार यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत आणि अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. महावीरसिंग चौहान यांनी करुन दिली. यावेळी त्यांनी महिलांचा स्वाभाव, कतृत्व व समाजातील त्यांच्या स्थानाबद्दल कवीता सादर केली. याप्रसंगी डॉ. गौरी पवार यांनी उपस्थित महिला व विद्यार्थीनीबरोबर संवाद साधला व त्यांच्या आरोग्य समस्यांबद्दल उत्तरे दिली. या कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थीनी कु. दिव्या साठे यांनी मानले.