राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेंमत शिबिराने शेवगावकरांच्या डोळ्याचे फेडले पारणे. शिबीरार्थीच्या संस्काराने शिस्त व धाडसाचे घडवले दर्शन.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेंमत शिबिराने शेवगावकरांच्या डोळ्याचे फेडले पारणे. शिबीरार्थीच्या संस्काराने शिस्त व धाडसाचे घडवले दर्शन.

राष्ट्रीय सवयंसेवक संघाच्या हेमंत शिबीराने शेवगावकरांच्या डोळ्याचे फेडले पारणे शिबिरार्थी च्या संस्कारांने शिस्त व धाडसाचे घडविले दर्शन

शेवगाव, 

     शेवगावात नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित तीन दिवसीय हेमंत (हिवाळी ) शिबिराने शेवगावकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले तसेच संस्काराने काय घडू शकते हे बालगोपाल शिबीरार्थीच्या शहरात झालेल्या पथ संचलनाच्या शिस्तीने व त्यानंतरच्या साहसी खेळाद्वारे अवघ्या तीनच दिवसात निर्माण झालेल्या धाडसाचे प्रत्यंतर घडले.

      शिबिराच्या शेवटच्या दिवशी शिबिरार्थीनी शहरातून शिस्तबद्ध शानदार पथसंचलन केले. शिबिर स्थळापासून निघालेल्या या संचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २५ बुलेट स्वार पदाधिकारी व ज्येष्ठ स्वयंसेवक अग्रभागी होते .त्यांच्या मागे शिबिरार्थी व अन्य स्वयंसेवक होते. त्यामागे दिमाखदार घोष पथक व घोडेस्वार व उंट स्वार स्वयंसेवक आणि सजविलेला भगव्या ध्वजाचा रथ होता .असे लहान थोर मिळून अडीच हजारावर स्वयंसेवकांचे दीड किलोमीटर लांबीचे पथसंचलन संघाच्या गणवेशात, घोषाच्या तालात शिस्तबद्ध पुढे सरकत होते .तीन तासानंतर संचलन शिबीर स्थळी पोहोचले. शहरातून पथसंचलन होत असताना शेवगावकरांनी या स्वयंसेवकावर ठिकठिकाणी पुष्प वृष्टी करून त्याचे स्वागत केले.

       संचलनाच्या विरामानंतर रात्री अभ्यागतासमोर स्वयंसेवकाच्या शिस्तीच्या व धाडसाच्या अनेक उपक्रमांचे प्रदर्शन करण्यात आले . यावेळी संचालनाचे व घोषाचे विविध प्रकार, दंड लढाईचे प्रकार ,कराट्याचे व अग्नी दिव्यातून पार पडण्याची प्रात्यक्षिके असे एकापेक्षा एक सरस उपक्रम सादर करण्यात आले . 

     यावेळी मंचावर प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र राज्य बालविभाग प्रमुख दीपकजी काळे,

 प्रांत संघचालक 

प्रांत संघचालक नानाजी जाधव,प्रमुख अतिथी व्यंकटेश मल्टीस्टेट & उद्योग समुह प्रमुरव अभिनाथ शिंदे ,जिल्हा संघचालक डॉ रविंद्र साताळकर, शिबिराधिकारी चंद्रकांत काळोखे हे मोजके पदाधिकारी होते.तर राम महाराज झिंजुर्के ,गोविंद महाराज जाटदेवळेकर , जिल्हा कार्यवाह वाल्मीक राव कुलकर्णी , सहकार्यवाह तात्या कारंडे ,आमदार मोनिकाताई राजळे ,पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नन्दकुमार शेळके, पारगावकर, यांचेसह मान्यवर खालील अभ्यागत कक्षेत बसले होते. 

       अतिथी अभिनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गात मिळणारे संस्कार हे आयुष्याला चांगली कलाटणी देणारे असतात. पंधरा वर्षांपूर्वी माझा संघाच्या शाखेशी संबंध आला असता तर माझ्या आयुष्यात यापेक्षा अधिक चांगले बदल घडले असते. अशा शब्दात संघाचा गौरव केला

       काळे म्हणाले संघाचे प्रशिक्षण वर्ग व नियमित शाखा यामुळे मुलांना बालपणापासून स्वयंशिस्तीचे,

 देशभक्तीचे धडे मिळतात. बाल वयापासून मुलावर चांगले संस्कार झाले तर भविष्यात आदर्श समाज निर्मिती होऊ शकते .संघाच्या बौद्धिक प्रशिक्षणामुळे स्वयंसेवक शारीरिक व मानसिकरित्या खंबीर बनतो व स्वतःचा परिवार व देशाची जबाबदारी यशस्वीपणे पेलू शकतो .

       यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक जगदीश धूत ,डॉ. नीरज लांडे पाटील, डॉ. कृष्णा देहाडराय , महेश कवडे, गणेश रांधवणे, महेश गायकवाड, अजय शेळके, सचिन दळवी, गणेश केदार, साई सोनवणे, रामेश्वर डाके, विलास परदेशी, गणेश मोरे, नितीन मालानी, आदिनी शिबीरार्थीची उत्तम देखभाल केली. शिबीराचे प्रमुख व्यवस्थापक म्हणून राम देहाडराय यानी जबाबदारी पार पाडली. हरिष शिंदे यांनी आभार मानले .