*आज बार्शीत; बार्शी ग्रामीण रुग्णालय तालुकास्तरीय "आरोग्य मेळावा"*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बार्शी.(ता.बार्शी).         आज 21 एप्रिल वार गुरुवार रोजी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्याच्या वतीने सकाळी 10:00 वाजता बार्शी ग्रामीण रुग्णालय येथे तालुकास्तरीय आरोग्य मेळावा आयोजित करण्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतल बोपलकर यांनी दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढाले, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल कुमार जाधव, गट विकास अधिकारी संताजी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रोगां ची तपासणी मोफत होणार आहे या मेळाव्यात बालरोगतज्ञ, नाक, कान, घसातज्ञ, नेत्ररोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, जनरल फिजिशियन, जनरल सर्जन, भूलतज्ञ उपस्थित राहून सेवा देणार आहेत. मेळाव्यात महात्मा फुले जन आरोग्य सेवा अंतर्गत मिळणारे लाभ दिले जाणार आहेत. डिजिटल हेल्थ आयडी, आयुष्यमान कार्ड (ई-कार्ड) काढून देण्यात येणार आहेत.

शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी अशोक ढगे व अधीक्षक शितल बोपलकर यांनी केले आहे.