*परळीच्या प्रेसचालकाची मुलगी अपर्णा चौधरी हिची एम पी एस सी मधून झाली निवड*

*परळीच्या प्रेसचालकाची मुलगी अपर्णा चौधरी हिची एम पी एस सी मधून झाली निवड*

बी पी एस राष्ट्रीय न्यूज बीड

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

परळी- (ता.परळी).           परळी येथील प्रेस चालकाची मुलगी अपर्णा चौधरी हिची एम पी एस सी परीक्षेत निवड झाली. अपर्णा हिने कसल्याही प्रकारची खाजगी शिकवणी न घेता तिने आपल्या प्रयत्नातून हे यश मिळवले एवढेच नाही तर तिने पहिल्या परीक्षेचा निकाल येईपर्यंत दुसऱ्या परीक्षेतही घवघवीत यश मिळवले.

तिने घरच्या घरीच अभ्यास करून कसल्याही प्रकारची बाहेरची शिकवणी न घेता आपण पूर्णपणे सक्षम राहून अभ्यास करू शकतो असे तिने दाखवून दिले. एमपीएससी च्या वतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अभियांत्रिकी सेवा गट ब या परीक्षेत सिने घवघवीत यश मिळवले. एमपीएससी मध्ये पहिल्याच परीक्षेत यशस्वी होणारी अपर्णा चौधरी परळी येथील प्रेस व्यवसायिक गजानन चौधरी यांची मुलगी आहे. सन 2019 मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत पहिल्यांदा तिने स्पर्धा परीक्षा दिली अभियांत्रिकी सेवा गट ब या परीक्षेचा निकाल प्रक्रिया कोरोना काळ व मराठा आरक्षण यांच्या काही मुद्द्यामुळे थांबली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून तिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले सामान्य कुटुंबात असलेल्या अपर्णा चौधरी हिचे प्राथमिक शिक्षण परळीतील संस्कार विद्यालय येथे झाले 2020 मध्ये दिलेल्या एमपीएससी परीक्षेत ही यश मिळवले न्यू हायस्कूल ला माध्यमिक व त्यानंतर आंबेजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. विशेष म्हणजे तिने पूर्व परीक्षेच्या नोट्स घेऊन घरच्या घरी अभ्यास केला तिने ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा सुद्धा पुरेपूर फायदा घेतला. जास्त नोट्स व पुस्तकाचा वापर न करता तिने एकच पुस्तक व नोट्स याचा पुरेपूर अभ्यास करून त्यावर यश मिळवले आई वडील व भावाचे योगदान मिळाल्यामुळेच मला यश मिळाले असे अपर्णा चौधरी हिने सांगितले जेमतेम कुटुंबाची परिस्थिती असल्यामुळे तारेवरची कसरत करून आपल्या मुलीला शिकवले. आई-वडील, अपर्णा च्या यशामुळे परिस्थितीला झुकावे लागले. दोन्ही मुलांना चांगले शिकून मेहनतीचे यश प्राप्त केले असे सांगत वडील गजानन व आई स्नेहा चौधरी यांचे मन भरून आले. परळी करा कडून अपर्णा चौधरी हीचा घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राजेश साबणे, मोहन व्हावळे, धनंजय आढावा, प्रा. रविद्र जोशी, प्रा. प्रवीण फुटके, महादेव शिंदे, धीरज जंगले, स्वानंद पाटील, संभाजी मुंडे, बालाजी ढगे आदी उपस्थित राहून अपर्णा चौधरी हिचा सत्कार करण्यात आला.