शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव

पंचायत समिती राहुरी यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार कुरणवाडी तालुका राहुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय गोरक्षनाथ तेलोरे यांना प्रदान करण्यात आला.

चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचे काम प्राथमिक शिक्षकांकडून करण्यात येते समाजाचा शिल्पकार म्हणून शिक्षकांची ओळख आहे.अशाच प्रकारे संजय तेलोरे सरा यांनी शैक्षणिक क्षेत्रात एक उल्लेखनीय असे कार्य केला आहे. त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे विद्यार्थी शिकलेले आहेत ते अतिशय परिपूर्ण कलागुणांना संपन्न आहेत

या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पंचायत समितीचे सभापती सदस्य त्याचप्रमाणे तालुका भरातून आलेले अनेक शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली व संजय तेलोरे सरांचे अभिनंदन केले