*दीपक केसरकर यांचा सोमय्या यांना इशारा: आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य नकोच; नाहीतर फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार.*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)
सोलापूर: किरीट सोमय्या यांनी आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल वादग्रस्त व्यक्त करू नये अन्यथा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू अशा कडवट शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
सोमय्या यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे कोणालाही आवडणार नाही आम्ही जेव्हा वापस आलो होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे झाले आहे की आमचे नेते श्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत काही चुकीचे वक्तव्य करणार नाही ही विनंती फडणवीस यांनी मान्य केली आहे.
आमच्याबरोबर भाजपच्याही सर्व नेत्यांना याच्या सूचना दिल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून याची अंमलबजावणी व्हावी असेही केसरकर यांनी म्हटले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांना टोला लावला आहे यावर भाजप आणि शिवसेनेत वाद रंगण्याची चित्रे दिसून येत आहेत.
मंत्रालयात आज "रिक्षावाला" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटविल्याबद्दल अभिनंदन केले. असे वक्तव्य माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले. त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.