*कासारवाडी येथे श्री सिताराम महाराज समाधी सोहळा; अखंड हरिनाम सप्ताह सुरू*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे, बार्शी (बळेवाडी)

कासारवाडी-(ता.बार्शी)         येथील सच्चिदानंद श्री सद्गगुरु सिताराम महाराज मंदिर कृष्णाई नगर येथे लक्ष्मीबाई कदम यांच्या कृपेने श्री सद्गगुरू सिताराम महाराज समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह तसेच पारायण सोहळा सुरू झालेले आहे. हा भव्य मंगल सोहळा मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे दररोज काकड आरती, विष्णुसहस्त्रनाम, पारायण, सामुदायिक महिला भजन, हरिपाठ, हरी किर्तन, भजन असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम चालू आहेत. सोमवार दिनांक 21 रोजी दिंडी मिरवणूक होणार आहे तसेच मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजता श्री सिताराम महाराज समाधी सोहळा होणार आहे.

सोहळ्यातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उपस्थित राहून दर्शन व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.