*ताडलिंबला येथे "शाळापूर्व तयारी मेळावा" उत्साहात साजरा.*
बी.पी.एस.राष्ट्रीय लाईव्ह न्युज परभणी.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
ताडलिंबला- (ता.जि.परभणी). आज दि.12 एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडलिंबला ता. जि. परभणी येथे "शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांचे पालक-मुलांसह या मेळाव्यास उपस्थित होते.
तसेच गावचे सरपंच, ग्रामसेवक सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व शिक्षक प्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती संगीता भाऊसाहेब शेरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्री बालासाहेब पैठने, रामराव कोल्हे उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्रभारी मु.अ.सौ.करेवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर श्री बालासाहेब कदम यांनी शाळापूर्व तयारी यावर सविस्तर विवेचन केले.
अध्यक्ष, प्रमुख
अतिथी, विद्यार्थी व त्यांचे पालक यांची बॅण्ड पथकासह टोल पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी फीत कापून रीतसर उद्घाटन केले व सर्व स्टॉलला भेटी दिल्या. त्यानंतर प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासून विकास कार्डावर नोंदणी घेण्यात आल्या. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चिमटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बदाने सर यांनी मांडले.
वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेची टीम सौ. सुवर्णा कोरे मॅडम, श्री धोंडीराम बेंडसुरे सर, श्री पंडित होरे सर, अंगणवाडी ताई यांनी भरपूर मेहनत घेतली.
आजचा हा कार्यक्रम विद्यार्थी-पालक गावकरी व शिक्षक यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, सेवक, गावकरी प्रतिष्ठित मंडळी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.