काटोल येथे विविध संघटनेच्या वतीने बुद्ध जयंती उत्साहात साजरी
1.
काटोल:- विश्वशांतिचे जनक तथागत भगवान बुद्ध यांची 2567वी जयंती काटोल येथील विविध संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आला. सम्यक क्रांती ग्रुप यांच्या वतीने सकाळी ५ वा. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे बुद्ध भीम गीतांचा बुद्ध पहाट हा संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम सुप्रसिद्ध भीमगीत गायक शिरसाट सर व पखाले सर यांच्या संचांच्या वतीने अप्रतिम असे गीते गावून सादर केला या कार्यक्राची सुरवात द्वीप प्रज्वण माजी मुख्याध्यापक सुखदेव देशभ्रतार यांच्या हस्ते तर माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या हस्ते उद्घाटन करून शेकडो उपासकी व उपासक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ वार्षिक पौर्णिमा महोत्सव समितीच्या वतीने तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला माल्यार्पन करून पंचशिल त्रीसरन घेवुन शेकडो उपासक उपासकीनी अभिवादन केले. यावेळेस समितीचे संयोजक अनंतराव सोमकुवर व निमंत्रक दिगांबर डोंगरे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जिवन कार्यावर प्रकाश ताकत वार्षिक पोर्णिमेविशयीची माहिती दिली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला व भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेला माल्यार्पन करून पंचशिल ध्व्जाचे ध्वजारोहण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस उपस्थित कार्यकर्त्यानी अभिवादन केले.
यावेळेस सुखदेव देशभ्रतार विजय गायकवाड सुनिल मानकर वंचित च्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा निर्मला रक्षे कार्याध्य्क्षा प्रधण्या डोंगरे.शहर अध्यक्षा मिना पाटील तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत गौरखेडे, सतीश पाटील, अनंतराव सोमकुवर, नत्थुजी ढोके, भीमराव सोमकुवर, बाबाराव गोन्डाने, रमेश गौरखेडे, दिपक तिरफुडे, मिलिंद वाहने, सिद्धार्थ सहारे, प्रताप नागदीवे ,नरेंद्र मडके, भारत लखोटे, पांडुरंग खोब्रागडे ,वैशाली दलाल, ममता बनसोड, सुशीला पन्चभाई, वर्षा सोमकुवर ,ज्योती भालेराव, अर्चना झिल्पे यांच्यासह मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक उपस्थित होते.