चारगाव जवळ अज्ञात वीस वर्षीय मुलीचा मृतदेह

1.

काटोल:-  नागपूर काटोल राष्ट्रीय महामार्गवर चारगाव येथील  विटा भट्टी जवळ दुपारी २ च्या सुमारास अज्ञात मुलीची मृतदेह आढळल्याने  संपूर्ण शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे.  काटोल पोलीस स्टेशनला
दूरध्वनी द्वारे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शव आपल्या ताब्यात घेऊन उत्तर ये तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय काटोल येथे रवाना करण्यात आले.पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास करीत आहे.