काटोल येथील कामगार चौकात एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन
1.
कितीही संकटे आली तरी शेतकरी बांधवांनी आत्महत्या करू नका! दिगांबर डोंगरे
काटोल:- साहेबराव करपे यांनी केलेल्या कौटुंबिक आत्महत्येच्या स्मृती निमीत्य काटोल येथे विविध संघटनेच्या वतीने केले.एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनअनेक राजकीय व सामाजिक संघटनेने दिला प्रत्यक्ष पाठिंबा.देशातील व राज्यातील पहिली पारिवारिक शेतकरी सामूहिक आत्महत्या महाराष्ट्रातील.यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगवाण या गावात 19मार्च 1986मध्ये झाली होती, तेव्हापासून आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व नैसर्गिक संकटामुळे आत्महत्या केली.
त्यांच्या स्मृती निमीत्य व सहवेदणा व आत्मक्लेष म्हणून.आज काटोल येथे वंचित बहुजन आघाडी किसानपूत्र आंदोलन शेतकरी कामगार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट मराठा सेवा संघ विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना या संघटनेच्या वतीने स्थानिक कामगार चौक येथे एक दिवसीय अन्नत्याग,उपोषण आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे नागपुर जिल्हा उपाध्यक्ष तथा न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे किसान पुत्र आंदोलनाचे नेते संदीप धावडे अभिजित भगत, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे शहर अध्यक्ष प्रा विरेंद्र इंगळे शेतकरी संघटनेचे लक्ष्मणराव मेहर ,शिवसेना ठाकरे गटाचे माधवराव अनवाने वंचित चे शहर अध्यक्ष सुधाकर कावळे, अखिल भारतीय किसान युनियन चे महादेवराव नखाते ,कम्युनिस्ट पक्षाचे वामनराव धुर्वे शेतकरी संघटनेचे प्रवीण राऊत ,वंचित चे दिगांबर भगत सुरेश देशभ्रतार सतीश पाटील पुखराज रेवतकर अनिल ढोपरे शेर शिवाजी संघटनेचे सागर राऊत ,प्रहार चे आशिष जयस्वाल, मराठा सेवा संघाचे नरेंद्र राऊत यांनी उपोषण करीत आपले विचार व्यक्त केले.
या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाचे राहुल देशमुख जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजु हरणे.यांनीही पाठिंबा दर्शवत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना दिगांबर डोंगरे म्हणाले की साहेबराव करपे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून परीवारासहीत आत्महत्या केली.त्याची नोंद पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून देशात नोंद आहे. ते वर्ष 1986पासुन ते आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक पक्षाची सरकार बनली ,पण चेहरे बदलले ,मानसिकता बदलली पण शेतकऱ्याबाबत धोरण बदलले नाही. सततची नापीकी नैसर्गिक संकट शेतमालाला भाव न मिळणे ब्यान्काची व सावकारांच्या कटकटी दरवर्षी आलेले आर्थिक संकट त्यातच मुलांचे शिक्षण लग्न व परीवाराच्या पालनपोषनाची चिंता यामुळे त्रस्त होवुन मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहे. ही फार दुःखाची बाब आहे, पण सरकारला काही जाग येत नाही. कुटुंबातील प्रमुखांनी जिवन संपवल्यावर पूर्ण परिवार संकटात पडलो म्हणुन शेतकरी बांधवांनी आत्महत्या करू नका असे मार्मिक आव्हाहण डोंगरे यांनी यावेळी केले.
यावेळी संचालन व प्रास्तस्वीक प्रा.विरेंद्र इंगळे यांनी तर आभार दिगांबर भगत यांनी मानले.
अन्नत्याग आंदोलनात दिपक गुडधे ,ओंकार मलवे, हर्षद बनसोड, अयूब पठाण ,रामराव पाटील ,धिरज मांधडे, कैलाश अतकरे ,दिनेश तायडे, प्रफुल्ल महंत, शंकर सावरकर ,नामदेव
बगवे ,रमेश टेन्भेकर ,गणेश पाटील ,रमेश सावरकर ,श्रीकांत काटकर ,उमेश जुनघरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.