आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

1.

काटोल :- आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कमिटी तर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शासनाकडून प्रस्तावित वीजदर वाढी विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून काटोल येथे आम आदमी पार्टी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष युवा नेते वृषभ वानखेडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी काटोल यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या कार्यक्रमांमध्ये जिल्हा संघटन मंत्री सुनीलदादा वडस्कर, तालुकाध्यक्ष रमणजी मनकवडे, शहर अध्यक्ष अविनाश अटकळे, महिला अध्यक्षा रोशनीताई भजनघाटे, इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.

याप्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करावी, निवडणुकीमध्ये शिवसेनेमार्फत दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे 300 युनिट पर्यंत वीज जनतेला मोफत द्यावी, 30 टक्के प्रस्तावित दरवाढ रद्द करावी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई त्वरित द्यावी, कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना चालू करावी, इत्यादी मागण्या करण्यात आल्या. या मागण्या संदर्भात सरकारने लक्ष घालून न्याय दिला नाही तर, येत्या काळामध्ये महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वृषभ वानखेडे यांनी दिला. या आंदोलनाकरिता काटोल शहर तसेच ग्रामीण भागातून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

याप्रसंगी शेखर खरपुरिया, दत्ताजी धवड, पुरुषोत्तम हगवणे, हरीश पेंदाम, निलेश पेठे, केवल तुमडाम, संजय उपासे, निलेश वाघे, अरविंद बाविस्कर, कृष्णा ठाकरे, नीलिमाताई उईके, मंगेश टेकाडे, भोजराज मोहरिया, प्रकाश बोंद्रे, दिलीप वैद्य, दुर्गेश चौधरी, शैलेश गोलाईत, आकाश रंगारी, ओंकार इंगोले, माधवराव अनवाणे, कृष्णा डफरे, रणजीत कवळे, विठ्ठलराव फुके, मयूर डोंगरे, विक्की बोबडे, सुनील जुगसेनिया, रवी डोंगरे, गौरव भोकरे, आदर्श तायवाडे, श्रावणजी कोलते, अभिषेक कडवे, रामराव पाटील, शंकर नेहारे, रविंद्र आहाके, नंदा नेहारे, वर्षा मोरे, शेवंताबाई धुर्वे, चंद्रशेखर जिचकार, शैलेंद्र चिंचोरिया, केतन वानखेडे, रवी गुजरकर, इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.