सावनेर बोरुजवाडा उडाणपूलावर बेलोरो पिकअप आणि अंबुलेंस यांच्यात धडक, चार जण गंभीर जखमी .

1.

सावनेर बोरुजवाडा उडाणपूलावर बेलोरो पिकअप आणि अंबुलेंस यांच्यात धडक, चार जण गंभीर जखमी .

सोमवारी रात्री सुमारे 3.30 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला.

सावनेर : सावनेर- बोरुजवाडा जवळील उडानपूलावर्ती विपरीत दिशेने येत असलेल्या एका अनियंत्रित पीकअप वाहनांमुळे समोरून येणारी रुग्णवाहिकाला जोरदार धडक दिल्याने रुग्णवाहिकामध्ये बसलेले चार जण गंभीर जखमी झाले .

जखमींना समाजसेवी हितेश‌ बन्सोड यांनी आपल्या निःशुल्क एम्बुलेंस द्वारे तात्काळ नागपुर येथील मेयो रुग्णालयात दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचले . त्यानंतर जखमींच्या नातेवाइकांनी समाजसेवक हितेश बन्सोड यांचे‌ मनापासून आभार मानले.

सावनेर पोलीस ठाण्यांतर्गत सावनेर-नागपूर रोडवरील ग्राम बोरुजवाडा जवळील उड्डाणपूल येथे सोमवारी रात्री 3.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

बोलेरो पिकअप एमएच.40 बीएल 8694 चालकाचे नाव पवन बाळकृष्ण महल्ले (28) नरखेड निवासी असून पवन हा सदर क्रमांकाच्या पिकअपने विपरीत दिशेने भरधाव वेगात नागपूरला जात होता त्या दरम्यान नागपूरहून एमपी 48 डी 0960 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सौसर (मप्र)मार्गे जात होती .

विरुद्ध दिशेने येत असलेली बोलेरो पीकअप वाहनाने अंबुलेंसला समोरासमोर जोरदार धडक दील्याने अंबुलेंसमधे बसलेले चार जण गंभीर जखमी झाले. जखमींचे नावे प्रशांत सेंदुरपे, दिपक सेंदुरपे, केशवराम पवार आणि दीपक कवरती असे असून सर्व राहणार बैतूल मध्यप्रदेश असे आहे .

सदर प्रकरणा मध्ये बोलेरो पीकअप वाहन चालक पवन बाळकृष्ण महल्ले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पीएसआय व्यकेंटश दोनोडे करीत आहे .