बोधे गावातील त्या पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार:-फिरोज भाई पठाण

बोधे गावातील त्या पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार:-फिरोज भाई पठाण

बोधेगावातील त्या पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार :- फिरोजभाई पठाण

तब्बल ५ महिन्यानंतर आरोपीचा अटकपूर्व जमीन अर्ज अहमदनगर कोर्टाने केला नामंजुर.....

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका ४० वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना ही सहा महिन्यापुर्वी घडली होती. त्या अनुषंगाने पीडित महिलेच्या फिर्यादीवरून औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज-पंढरपूर येथील भंगार मालाचा व्यापारी मुसा हाजी शेख ( वय ५५ वर्षे ) या आरोपी विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल होताच सदरील औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज-पंढरपूर येथील आरोपी मुसा हाजी शेख ( वय ५० वर्षे ) याने बचावासाठी तसेच अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान सदरील खटला हा अहमदनगर येथील कोर्टात तब्बल पाच महिन्यापासून चालू होता. परंतु दि. २० डिसेंबर २०२२ रोजी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयाने सदर गुन्ह्यातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज हा नामंजूर केला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीला शेवगाव पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अटक करून लवकरात लवकर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून सदरील बोधेगाव येथील पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी बोधेगाव येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी केली आहे. पुढे अधिक माहिती देताना ते पठाण म्हणाले की, कायद्यावर आमचा पुर्ण विश्वास असून महिलेवर अन्याय करणाऱ्या अशा विध्वंसक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नराधाम व्यक्तीला शासनाने तसेच न्यायालयाने कठोर शासन करावे जेणेकरून या पुढील काळात आशा घटना घडणार नाही तसेच त्या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वच स्तरावर त्या महिलेसोबत राहून त्या पीडित महिलेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही बोधेगाव येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

बातमी चौकट :-

सदरील बोधेगाव येथील पीडित महिलेच्या गुन्ह्यामधील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगर जिल्हा न्यायालयाने तब्बल ५ महिन्यानंतर नामंजूर केला आहे. तसेच जोपर्यंत त्या पीडित महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची न्यायालयीन लढाई ही चालूच राहील. तसेच त्या महिलेला न्याय देण्यासाठी या लढ्यामध्ये वेळोवळी कायदेशीर मदत केली जाईल.

ॲड शर्मिला गायकवाड

पीडित महिलेच्या वकील, अहमदनगर

बातमी चौकट :-

मला लग्नाचे आमिष देऊन माझ्यावर अन्याय करणाऱ्या त्या नराधमाला पोलिसांनी तसेच न्यायालयाने कठोरात कठोर शासन करून मला न्याय मिळवून द्यावा. कायद्यावर तसेच न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. कायदा मला निश्चितच न्याय देईल ही अपेक्षा.